Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO | भारतात येताना राफेल विमानात 30 हजार फुट उंचीवर इंधन भरलं, पाहा खास फोटो
एकूण 36 राफेल विमानं फ्रान्स भारताला 2021 पर्यंत देणार आहे. 36 विमानांसाठी 59 हजार कोटींचा करार फ्रान्ससोबत झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान स्वच्छ राहिल्यास ही विमाने अंबाला इथल्या वायुसेना तळावर 29 जुलै 2020 रोजी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. या नव्या राफेल विमानांसाठी भारतीय वायुसेनेची 17 क्रमांकाची स्क्वाड्रन 'गोल्ड्न अॅरो' अंबाला वायुसेना तळावर उभारण्यात आली आहे.
फ्रान्सच्या दासो कंपनीतून मागवलेली ही सर्व विमाने दोन टप्प्यांमध्ये भारतात येतील. ह्या पहिल्या टप्प्यातील पाच विमाने भारतीय वायुदलाचे विशेष प्रशिक्षित वैमानिक उड्डाण करून घेऊन येत आहेत.
भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन काल उड्डाण केलं. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन आसनांची आहेत.
फ्रान्समधील भारतीय अॅम्बेसीने विमानात इंधन भरतानाचे फोटो ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. राफेल विमानं यूएईच्या फ्रान्सिस मिलिट्री बेसवर थांबली होती.
फ्रान्सवरुन पाच राफेल विमानं बुधवारी अंबाला वायुसेनेच्या बेसवर पोहोचतील. जवळपास 7 हजार किमीच्या प्रवासादरम्यात विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -