पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून एमजी मोटरच्या 'महिला क्रू'कडून 50,000 व्या हेक्टरची निर्मिती
व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास महिला आणि पुरुष हे दोघेही एकसारख्याच क्षमतेने मशीनरी हाताळू शकतात. या पुरोगामी विचारसरणीमुळे आजवर श्रम-केंद्रित मानल्या जाणार्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात एमजी मात्र स्त्री पुरुष दोघांनाही समान संधी देत आहे.
हीच परंपरा पुढे नेत, आपल्या संघटनेत भविष्यात 50% लिंग विविधता साध्य करून एक संतुलित कर्मचारी-गट उभा करण्याचे एमजीचे लक्ष्य आहे.
ऑटोमोबाइल निर्मितीसारख्या एके काळच्या पुरूषांचे वर्चस्व असणार्या उद्योगात देखील आता महिलांना कुठलीच आडकाठी राहिलेली नाही.
संपूर्ण-महिला टीमने निर्मिलेली आमची 50,000वी एमजी हेक्टर ही महिलांचे यातील योगदान आणि परिश्रम यांची गौरवगाथा सांगते.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “एमजी हा पहिल्यापासून एक पुढारलेला ब्रँड आहे.
येथे, महिला व्यावसायिक आपल्या पुरुष सह-कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्व प्रकारची कामे करतात.
एमजी मोटर इंडियाचा अत्याधुनिक असा उत्पादन कारखाना गुजरातच्या हालोल (पंचमहाल जिल्हा) येथे आहे. ब्रिटिश वारसा चालवणार्या या कार उत्पादन कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये तब्बल 33% वाटा महिलांचा आहे, जो या क्षेत्रात विशेषच म्हटला पाहिजे.
यात संपूर्ण महिलांच्या टीमने शीट मेटल्सच्या पॅनल प्रेसिंगपासून वेल्डिंग, पेंटिंग आणि उत्पादनानंतर टेस्ट रनपर्यंत सगळी कामे केली आहेत.
यात कारची संपूर्ण निर्मिती महिलांनी केली आहे असून ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे.
एमजी मोटर इंडियाच्या गुजरातेतील वडोदरामधील संपूर्ण महिला क्रूने 50,000 व्या एमजी हेक्टरची निर्मिती केली आहे. ही गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रात लिंगभेदाला स्थान नसल्याचा पुरावा आहे.