PHOTO | पालघरमध्ये लॉकडाऊन काळातही महिलाना बांबूपासून राख्या बनवण्याचा उद्योग
गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या आकाश कंदील देखील या महिला बांबूपासून तयार करत आहेत. सध्या येथील महिला राख्या बनवण्यात मग्न आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील आदिवासी गरजू महिलांना त्यांच्याच घरात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केशव सृष्टी कडून केले जातंय.
घरा शेजारीच कधी नव्हे तो रोजगार मिळाल्याने महिलांकडूनही समाधान व्यक्य होतंय.
केशव सृष्टी ग्रामविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून सध्या पालघरमधील डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील गरजू महिलांना बांबूपासून राख्या बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सुमारे तीनशे महिलांना 50000 राख्या बनवण्याचं काम दिल गेलं आहे.
कोरोनाचा परिणाम रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्यांवरही झालेला पाहायला मिळाला असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या राख्या चीनसह इतर देशातून आयात केल्या जातात. मात्र सध्या आयात बंद असल्याने पालघरमधील ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम व्यवसायांसह आयात-निर्यातीवर होऊ लागला आहे. काही दिवसांवर आलेला रक्षाबंधन सण ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या हाताला काम देऊन गेलाय. हा रोजगार कोरोनाच्या काळात या ग्रामीण भागातील महिलांसाठी आशादायी ठरलाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -