Milk Agitation | दूध दरासाठी राज्यात स्वाभिमानीचं आंदोलन; कुठे टँकर फोडले, तर नागरिकांमध्ये वाटप
नाशिकमध्ये चिंचखेड गावातील शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज नागरिकांना संकलन केलेल्या दुधाचे वाटप करण्यात आलं. कौलव गावातील हे चित्र आहे.
गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात पहाटेपासून सुरुवात झाली.
सांगलीतील राधानगरी तालुक्यातील शिरसे गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाची नासाडी नको म्हणून गावातील नागरिकाना दूध वाटप केले.
नगरमधील अकोले तालुक्यातील अनेक गावात आजही आंदोलन केलं जात आहे. दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.
पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 दर आणि प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.
सोलापूरातील बार्शी तालूक्यातील जवळगाव गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाईला दूधाचा अभिषेक घालून आपला निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने दूध उत्पादकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवाव आणि दूधाला भाव वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -