Women Sleep Needs : महिलांना अधिक झोपेची आवश्यकता का भासते? अभ्यासातून समोर आलं खरं कारण!
Women Sleep Needs : महिलांना पुरुषांपेक्षा थोडी अधिक झोप आवश्यक असते कारण त्यांच्या शरीरात वारंवार होणारे हार्मोनल बदल आणि जबाबदाऱ्या अधिक विश्रांतीची गरज निर्माण करतात.
Continues below advertisement
Women Sleep Needs
Continues below advertisement
1/9
आपल्या शरीरासाठी नियमित पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जर झोप नीट झाली नाही, तर थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे.
2/9
अनेक संशोधनांनुसार, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. महिला सरासरी पुरुषांपेक्षा 10 ते 15 मिनिटं जास्त झोप घेतात.
3/9
याचं कारण म्हणजे महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल वारंवार होतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि मोनोपॉजमुळे झोपेचा पॅटर्न बदलतो आणि शरीराला अधिक विश्रांतीची गरज भासते.
4/9
महिला घरातील कामाबरोबरच ऑफिसचं कामदेखील करतात त्यामुळे त्यांना पूर्ण ताजेतवाने वाटण्यासाठी थोडी जास्त झोप आवश्यक असते.
5/9
महिलांवर घरातील, कामाच्या आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या जास्त असतात. या सततच्या कामामुळे मेंदू थकतो आणि विश्रांतीची गरज वाढते.
Continues below advertisement
6/9
तज्ञ सांगतात की, झोप शरीराचं रिचार्ज बटण आहे. पुरेशी झोप घेतल्याने मूड चांगला राहतो, एकाग्रता वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं.
7/9
यासाठीच महिलांनी झोपेला दुर्लक्षित करू नये. नियमित वेळेवर झोप आणि पुरेशी विश्रांती हे आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
8/9
थोडक्यात सांगायचं तर, महिलांना पुरुषांपेक्षा थोडी जास्त झोप आवश्यक असते. आणि प्रत्येक महिलांनी त्यासाठी वेळ काढायलाच हवा.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Nov 2025 04:05 PM (IST)