Valentine Week 2026 : गुलाबी थंडी आणि प्रेमाचा आठवडा! 'रोझ डे' पासून होणार व्हॅलेंटाईन विकची सुरुवात
Valentine Week 2026 : व्हॅलेंटाईन वीक हा आपल्या मनातील आपल्या पार्टनर बद्दलच्या भावना प्रत्यक्षात व्यक्त करण्याचा हा आठवडा असतो. यावर्षी व्हॅलेंटाईन डे चा आठवडा कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.

Valentine Week 2026
1/11
व्हॅलेंटाईन वीक प्रेमी जोडप्यांचा उत्सवाचा आठवडा असतो. आपल्या मनातील आपल्या पार्टनर बद्दलच्या भावना प्रत्यक्षात व्यक्त करण्याचा हा आठवडा असतो.
2/11
खरंतर प्रेमासाठी काही एक दिवस पुरेसा नव्हे. पण, गुलाबी फुलं, चॉकलेट्स, आकर्षक गिफ्ट्सद्वारे नातेसंबंध घट्ट करण्याची संधी या आठवड्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते.
3/11
दरवर्षी व्हॅलेंटाईन विक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान साजरा केला जातो. या वर्षी कोणता डे कोणत्या तारखेला आहे हे जाणून घेऊयात.
4/11
रोझ डे 7 फेब्रुवारी शनिवारी : आपल्या पार्टनरला लाल गुलाब देऊन शब्दांविना तुमच्या भावना व्यक्त केल्या जातात आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे.
5/11
प्रपोस डे 8 फेब्रुवारी रविवार : मनातल्या भावना शब्दांद्वारे सांगण्याची सुवर्णसंधी. या दिवशी प्रेमाची कबुली देऊन तुमच्या नात्याला नाव देता येते.
6/11
चॉकलेट डे 9 फेब्रुवारी सोमवार : नात्यातला गोडवा असणं तर महत्त्वाचं आहे, त्यासाठी आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन नात्यातील गोडवा वाढवला जातो.
7/11
टेडी डे 10 फेब्रुवारी मंगळवार : आपल्या पार्टनरसाठी आपलं किती प्रेम आणि जिव्हाळा आहे हे सांगण्यासाठी त्यांना टेडी दिला जातो, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या आजूबाजूला आहात असं त्यांना वाटतं.
8/11
प्रॉमिस डे 11 फेब्रुवारी बुधवार : हा दिवस असतो वचन देण्याचा आणि घेण्याचा. या दिवशी दोघांतील नातं घट्ट करण्याचं आणि नेहमी एकमेकांबरोबर राहण्याचं वचन दिलं जातं.
9/11
हग डे 12 फेब्रुवारी गुरुवार : भावना शब्दांविना व्यक्त करण्यासाठी एक मिठीही पुरेशी असते.
10/11
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी शनिवार : हा दिवस या आठवड्यातील शेवटचा दिवस असतो. त्यामुळे तुमच्या पार्टनरला आकर्षक गिफ्ट द्या आणि सरप्राईज द्या.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Feb 2026 04:05 PM (IST)