Strong Bones : रोजच्या आहारात घ्या 'या' गोष्टी, हाडं राहतील तंदरुस्त!
Strong Bones : दररोजच्या आहारात दूध, दही, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स आणि मासे यांचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
Continues below advertisement
Strong Bones
Continues below advertisement
1/10
आजकाल अनेक लोकांना जिने चढताना किंवा खाली उतरताना त्यांच्या गुडघ्यांतून आणि कंबरेतून आवाज येतो.
2/10
पण कधी-कधी ही लक्षणं तेव्हा दिसून येतात जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं आणि सांधे कमकुवत होऊ शकतात.
3/10
आजकाल ही समस्या फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते.
4/10
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना त्यांच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या शरीरात वेदना, थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
5/10
जर तुम्ही दररोज एक ते दोन ग्लास दूध प्याल तर तुमच्या शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळू शकतात. कारण दुध, दही आणि चीज यासारख्यां डेअरी उत्पादने कॅल्शियमचे उत्तम स्रोत मानले जातात.
Continues below advertisement
6/10
याशिवाय पालक, मेथी, आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात.
7/10
तसेच, ड्रायफ्रूट्सदेखील कॅल्शियमसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही भिजवलेले बदाम रोज खाल्लेत तर तुमची हाडं निरोगी राहण्यास मदत करतात.
8/10
आठवड्यातून एक-दोन वेळा माशांचे सेवन केल्याने देखील तुमची हाडं मजबूत राहण्यास मदत करतात.
9/10
त्याचबरोबर, सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणं देखील फायदेशीर आहे. कारण सूर्यप्रकाशातून शरीराला नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन D मिळतं.
10/10
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 07 Nov 2025 01:37 PM (IST)