HOME REMEDIES AFTER SHAVING : शेविंग किंवा वॅक्सिंग नंतर होणाऱ्या जळजळीवर घरगुती उपाय
HOME REMEDIES AFTER SHAVING : थ्रेडिंगनंतर चेहऱ्यावर लालसरपणा, खाज किंवा जळजळ होऊ शकते. बर्फ थेट लावू नका, त्याऐवजी घरगुती उपाय त्वचेला थंडावा देऊन त्रास कमी करतात.
Continues below advertisement
HOME REMEDIES AFTER SHAVING
Continues below advertisement
1/9
थ्रेडिंगनंतर चेहऱ्यावर लालसरपणा, खाज किंवा जळण जाणवते. अनेकदा लोक यासाठी बर्फ वापरतात पण तो थेट लावल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं.अशा वेळी घरगुती उपाय त्वचेला थंडावा देतात आणि होणार त्रास कमी करतात.
2/9
थ्रेडिंग हा केस काढण्यासाठी सर्वाधिक जास्त वापरला जाणारा उपाय आहे. या प्रक्रियेनंतर त्वचा संवेदनशील होते ज्यामुळे हलकी सूज किंवा लालसरपणा येऊ शकत . यावर नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर त्वचेला त्वरित आराम मिळत.
3/9
थंड दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे जळजळ कमी करते.दुधात कापसाच्या बोळ्या भिजवून चेहऱ्यावर फिरवल्यास थंडावा मिळतो. ज्यामुळे त्वचा मऊ राहते आणि छिद्रांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
4/9
काकडी पाण्याने समृद्ध असल्याने त्वचेला त्वरित थंडावा देते. थ्रेडिंगनंतर थंडगार काकडीचे तुकडे चेहऱ्यावर ठेवले तर लालसरपणा कमी होतो. काकडीचा रस मसाजसाठी वापरल्यास त्वचा ताजीतवानी आणि मऊसर राहते .
5/9
दह्यामध्ये नैसर्गिक थंडावा आणि उपयुक्त प्रोबायोटिक्स असतात. ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला संरक्षणात्मक थर मिळतो. यामुळे खाज, जळजळ कमी होते आणि त्वचा गुळगुळीत दिसते.
Continues below advertisement
6/9
गुलाबजल हे त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक टोनर मानले जाते. कापसावर गुलाबजल लावून चेहऱ्यावर फिरवल्यास थंडावा जाणवतो. ज्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते आणि चेहरा उजळून दिसतो.
7/9
अॅलोवेरा जेल हे थ्रेडिंगनंतरच्या त्रासावर उपयुक्त ठरते. ते त्वचेला शांती देतं आणि लालसरपणा कमी करतं. नियमित वापराने त्वचा अधिक टवटवीत आणि निरोगी राहते.
8/9
थ्रेडिंगनंतर बर्फ लावण्यापेक्षा घरगुती उपाय जास्त सुरक्षित आहेत. हे नैसर्गिक उपाय त्वचेला शीतलता देतात आणि त्रास कमी करतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य टिकून राहतं आणि त्वचा निरोगी दिसते.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 23 Aug 2025 02:39 PM (IST)