skin cancer symptoms : त्वचेचा कॅन्सर वेळीच ओळखा! 'ही' लक्षणं फार कमी लोकांना माहीत...
skin cancer symptoms : त्वचेचा कर्करोग सूर्याच्या अतिनील किरणांमुळे जास्त होतो, त्याची लक्षणे लवकर ओळखणे आणि सनस्क्रीनसह योग्य संरक्षण करणे हा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

skin cancer symptoms
1/9
त्वचेचा कॅन्सर हा त्वचेच्या पेशींमध्ये होणारा गंभीर आजार आहे, ज्यामध्ये असामान्य पेशी वेगाने वाढतात आणि त्यामुळे लक्षणे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असते.
2/9
या कर्करोगाचे BCC, SCC आणि मेलेनोमा असे प्रकार असून, मेलेनोमा सर्वात धोकादायक मानला जातो कारण तो शरीरात लवकर पसरू शकतो.
3/9
सूर्याच्या अतिनील किरणांना जास्त वेळ तोंड देणे, सनस्क्रीन न वापरणे किंवा सतत उन्हात काम करणे हा या आजाराचा मोठा धोका मानला जातो.
4/9
चेहरा, मान, हात-पाय यांसारख्या सतत सूर्यप्रकाशात राहणाऱ्या भागांमध्ये या कॅन्सरच्या खुणा जास्त दिसून येतात.
5/9
गोरी त्वचा, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा जास्त तीळ असलेले लोक त्वचेच्या कॅन्सरला विशेषत जास्त धोका असलेले मानले जातात.
6/9
नवीन त्वचेच्या गाठी दिसणे, न भरणारी जखम, तीळांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे ही ह्याआजाराची महत्त्वाची चेतावणी चिन्हे आहेत.
7/9
तीळ असमान दिसणे, त्याच्या कडा अस्पष्ट होणे, काळसर किंवा अनेक रंग दिसणे आणि आकार अचानक वाढणे हे मेलेनोमाचे प्रमुख संकेत असू शकतात.
8/9
उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरणे, योग्य कपडे घालणे, उन्हापासून दूर राहणे आणि त्वचेवर बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे हे स्वत चे संरक्षण करण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत.
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 21 Nov 2025 12:22 PM (IST)