Cracked Heels Remedy : फाटलेल्या टाचांपासून मुक्ती मिळवा या सोप्या पद्धतीने!
Cracked Heels Remedy : हिवाळ्यात टाचा मऊ ठेवण्यासाठी दररोज नारळ तेल, मॉइश्चरायझर किंवा घरगुती मिश्रण लावून पाय स्वच्छ, ओलसर आणि झाकून ठेवा.
Continues below advertisement
Winter Foot Care Tips
Continues below advertisement
1/9
हिवाळ्यात टाचांची त्वचा कडक आणि सुकी होते. कधी कधी भेगा खोल होऊन चालणे कठीण होते. उपचार न केल्यास वेदना आणि संसर्गही होऊ शकतो. महागड्या क्रीमची गरज नाही, काही घरगुती उपाय पुरेसे आहेत.
2/9
अनवाणी राहणं, उघड्या चप्पला वापरणं किंवा थंड पाण्यात राहणं त्वचा कोरडी करून टाचा फुटवू शकतं. मॉइश्चरायझर लावल्यास हा त्रास टाळता येतो.
3/9
गुलाबपाणी, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन एकत्र मिसळा. हे मिश्रण बाटलीत साठवा. दररोज झोपण्यापूर्वी पायांवर लावा आणि मालिश करा. यामुळे टाचा मऊ आणि गुळगुळीत होतात.
4/9
थोडं मेण गरम करा आणि त्यात ग्लिसरीन, हळद आणि नारळ तेल मिसळा. थंड झाल्यावर ते एका डब्यात ठेवा. झोपण्यापूर्वी पायांवर लावा आणि मोजे घाला. काही दिवसांत भेगा भरू लागतील आणि त्वचा मऊ बनेल.
5/9
पिकलेले केळ, मध आणि कोरफड जेल एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट 20 मिनिटे पायांवर लावा. धुण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून तीन वेळा वापरा. पाय मऊ आणि चमकदार दिसतील.
Continues below advertisement
6/9
कोमट पाण्यात थोडं मीठ, तुरटी आणि शॅम्पू घाला. त्यात पाय 15 मिनिटं बुडवा. प्युमिस स्टोन किंवा स्क्रबरने टाचा घासा. कॉफी, साखर, मध आणि नारळ तेलाने घरगुती स्क्रबही करा. स्क्रब केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
7/9
पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. रात्री नारळ तेल किंवा एरंडेल तेल लावा. हलके मसाज करा आणि मोजे वापरा. उघड्या चप्पलांऐवजी मऊ, बंद चपला वापर
8/9
नारळ तेल त्वचेला खोलवर पोषण देते, कोरडेपणा कमी करते आणि टाचांना मऊ ठेवते. रोज रात्री पाय धुवून तेल लावा. काही दिवसांत फरक जाणवेल आणि टाचा सुंदर दिसतील.
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 11 Nov 2025 12:46 PM (IST)