Papaya Juice Benefits : पपईचा ज्यूस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी; शरीराला मिळतात अनेक फायदे
पपईमध्ये आढळणारे पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे पपई हे फळ प्रत्येकाने खायला हवे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपपईमध्ये कार्बोहायड्रेट्स, अल्कली, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न हे प्रमाण आढळून येते ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
पपईचा ज्यूस प्यायल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.
पपईचा ज्यूस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. कारण त्यामध्ये 'क' जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असते.
ज्यांना सुंदर आणि नितळ त्वचा हवी असेल त्यांनी पपईचा ज्यूस नक्की प्यावा. कारण या फळात अनेक कॅल्शियमयुक्त घटक असतात.
त्याचप्रमाणे बाजारात अनेक पपईचे फेसपॅकदेखी मिळतात. यामुळे त्वचेला छान थंडावा मिळतो. तसेच, चेहऱ्यारील मृत पेशी निघून जातात.
पपईचा रस मासिक पाळीच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतो. यामुळे अनियमित मासिक पाळी आणि क्रॅम्पपासून आराम मिळतो.
पपईचा ज्यूसदेखील वजन कमी करण्यास मदत करतो. कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे चरबी कमी करण्याचे काम करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.