Overuse of Antibiotics : अँटिबायोटिकचा अतिरेक? सावध राहा, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!

Overuse of Antibiotics : अँटिबायोटिकचा चुकीचा वापर भविष्यात गंभीर आरोग्य संकटाचे कारण ठरू शकतो.

Continues below advertisement

Overuse of Antibiotics

Continues below advertisement
1/11
अँटिबायोटिक औषधांचा वापर आजकाल खूप सामान्य झाला आहे. सर्दी, खोकला, ताप किंवा डोकेदुखी झाली की अनेक लोकं स्वतःहून औषध घेतात. पण अशा सवयीमुळे शरीरावर उलटा परिणाम होऊ शकतो.
2/11
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2023 मध्ये अनेक जीवाणू संसर्गांवर अँटिबायोटिक औषधे काम करत नाहीत. याचा अर्थ असा की काही संसर्गांवर साधी औषधे उपयोगी ठरत नाहीत.
3/11
डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेणं तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. अँटिबायोटिकचा वारंवार वापर केल्याने शरीरात प्रतिरोधक जीवाणू तयार होऊ शकतात.
4/11
या स्थितीला अँटिबायोटिक रेसिस्टन्स असे म्हणतात. भविष्यात ही एक गंभीर आरोग्य समस्या होऊ शकते.
5/11
मूत्रमार्ग आणि रक्तप्रवाहातील संसर्गांमध्ये ही समस्या जास्त दिसून येतात. भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात ही समस्या सर्वाधिक आहे.
Continues below advertisement
6/11
भारतामध्ये अनेक संसर्ग अँटिबायोटिकला प्रतिसाद देत नाहीत. यामुळे आजार बरे होण्यास जास्त वेळ लागतो.
7/11
लोक औषधांचा कोर्स अर्धवट ठेवतात, त्यामुळे जीवाणू पूर्ण नष्ट होत नाहीत. अशा जीवाणूंवर पुढची औषधे परिणाम करत नाहीत.
8/11
यामुळे साधे आजारही गंभीर होऊ शकतात. रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागते. उपचाराचा खर्चही वाढतो.
9/11
अँटिबायोटिक औषधे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करावा.
10/11
औषधे कोणाशीही शेअर करू नयेत. स्वच्छता राखून आणि संसर्गापासून बचाव करून आपण ही समस्या टाळू शकतो.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola