Mango Leaves Tea : दररोज एक कप आंब्याच्या पानांचा चहा घ्या, शरीर राहील निरोगी!
आंब्याच्या पानांचा चहा हा नैसर्गिक औषध असून, तो साखर, कोलेस्टेरॉल, वजन आणि श्वासाच्या तक्रारी नियंत्रित ठेवून शरीर तंदुरुस्त ठेवतो.

Mango Leaves Tea
1/9
फळांचा राजा आंबा चव आणि सुगंधासाठी जगभर प्रसिद्ध आहे. पण त्याची पानेही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. आयुर्वेदानुसार, आंब्याच्या पानांचा चहा पिल्याने अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
2/9
आंब्याची पाने नैसर्गिक मल्टीविटामिन असून, त्यांचा चहा दररोज प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.
3/9
तज्ज्ञ सांगतात की आंब्याच्या पानांतील टॅनिन आणि अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. सकाळी रिकाम्या पोटी तो प्यायल्याने साखर नियंत्रणात राहते.
4/9
आंब्याच्या पानांचा चहा कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स हृदय मजबूत करतात आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात.
5/9
आंब्याच्या पानांच्या चहातील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, संसर्गापासून बचाव करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ दूर करतात.
6/9
आंब्याच्या पानांचा चहा पचनक्रिया वाढवून चरबी कमी करतो, त्यामुळे वजन घटवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.
7/9
दमा किंवा श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्यांसाठी आंब्याच्या पानांचा चहा फायदेशीर आहे. तो वायुमार्ग स्वच्छ करून श्वास घेणं सोपं करतो.
8/9
आंब्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी 5-6 पाने दोन कप पाण्यात 10 मिनिटे उकळा. नंतर ते गाळून त्यात थोडा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला आणि कोमट असतानाच प्या.
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 31 Oct 2025 02:49 PM (IST)