Food Awareness : शाकाहारी समजून खाताय? जरा थांबा! दिसायला व्हेज पण खरं तर नॉन-व्हेज!

Food Awareness : दिसायला शाकाहारी वाटणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये लपलेले मांसाहारी घटक असतात, त्यामुळे खाण्यापूर्वी लेबल नेहमी तपासा.

Continues below advertisement

Food Awareness

Continues below advertisement
1/10
आजकाल बाजारात अनेक पदार्थ शाकाहारी म्हणून विकले जातात, पण प्रत्यक्षात त्यांच्या तयारीत मांसाहारी घटक वापरलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ दिसायला शाकाहारी असले तरी खरेतर तसे नसतात.
2/10
बऱ्याच लोकांना वाटतं की बाजारातील सगळे व्हेज पदार्थ पूर्णपणे शाकाहारी असतात, पण हे नेहमीच खरं नसतं. अनेक पदार्थांमध्ये लपलेले मांसाहारी घटक असतात जे लगेच लक्षात येत नाहीत.
3/10
हिवाळ्यात लोकांना भाज्यांचे सूप पिणं आवडतं. पण हे माहीत आहे का की काही सूपमध्ये चव वाढवण्यासाठी चिकन ब्रोथ वापरला जातो? त्यामुळे ते सूप मांसाहारी ठरते.
4/10
चिकन ब्रोथ सूपला घट्टपणा आणि खास स्वाद देतो, पण तो प्राण्यांपासून मिळवला जात असल्यामुळे तो शाकाहारी नाही. त्यामुळे सूप मागवताना नेहमी विचारून घ्या की ते खरंच व्हेज आहे का.
5/10
अनेकांना गोड पदार्थ आवडतात, विशेषत मार्शमॅलो. पण मार्शमॅलोमध्ये एरेटर नावाचा घटक असतो, जो जिलेटिन असतो आणि जिलेटिन प्राण्यांच्या हाडांपासून बनतो.
Continues below advertisement
6/10
जेली टॉफीमध्येही जिलेटिन वापरले जाते. त्यामुळे दिसायला रंगीत वाटणारी जेली प्रत्यक्षात मांसाहारी ठरते.
7/10
काही कंपन्या मात्र पूर्णपणे शाकाहारी जेली बनवतात, पण त्या ओळखण्यासाठी नेहमी लेबल नीट वाचणं गरजेचं असतं.
8/10
म्हणून अशा पदार्थांना शाकाहारी समजून खाताना खबरदारी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या घटकांमध्ये मांसाहारी पदार्थ मिसळलेले असू शकतात.
9/10
काहीही खरेदी करताना किंवा खाण्यापूर्वी नेहमी लेबल तपासा आणि खात्री करा की तो पदार्थ खरंच शुद्ध शाकाहारी आहे की नाही.
10/10
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola