Iron Burn Shirt: फॅशनच्या जगात नवीन ट्रेंड; इस्त्रीने जळालेले शर्ट चक्क 1 लाख रुपयांना! अजब ब्रॅण्डची गजब फॅशन...
माझी आई असे शर्ट मोफत बनवते अश्या विनोदी कमेंट्स व्हेटमेंट्स ब्रॅण्डच्या हास्यास्पद क्रिएटिव्हिटीला मिळत आहे. आश्चर्य म्हणजे या ब्रॅण्डचा डागअसलेला शर्ट तब्बल 1 लाख रुपयांना विकला जात आहे.

Iron Burn Shirt
1/11
सध्या फॅशन म्हंटलं कि क्रिएटिव्हिटी आलीच. अनेक कंपन्या आपला ब्रँड जगभर पसरावा, आपल्या ब्रॅण्डचा विस्तार व्हावा म्हणून नवनवीन क्रिएटिव्हिटी करतात.
2/11
या क्रिएटिव्हिटीचा कधीकधी चांगला परिणाम होतो आणि फॅशनच्या जगात चांगला प्रतिसाद मिळतो. पण तेच कधीकधी हिही क्रिएटिव्हिटी हास्यास्पद ठरते. आणि जनतेत त्याची खिल्ली उडवली जाते.
3/11
इस्त्रीने जळाल्याचा डाग (Iron Burn) असलेला साधा पांढरा शर्ट फॅशन म्हणून 'व्हेटमेंट्स' ब्रॅण्डने बाजारात आणला आहे.
4/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
5/11
या एका साध्या पण 'जळालेल्या' शर्टची किंमत 1139 डॉलर्स आहे, जो भारतीय चलनात सुमारे 1 लाख रुपये आहे.
6/11
या शर्टचे अधिकृत नाव 'White Ironing Burn Graphic Shirt' असे आहे. या शर्टमध्ये वेगळा काय हे पाहूनच कळेल, हा ओव्हरसाईज शर्ट असून त्यावर ग्राफिक्सद्वारे इस्त्रीने कापड जळाल्याचे डिझाइन आहे.
7/11
'व्हेटमेंट्स' ब्रॅण्डने हे शर्ट पब्लिश केल्या नंतर सोशल मीडियावर विनोदी कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.
8/11
'माझी आई असे शर्ट मोफत बनवते' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या फॅशनची खिल्ली उडवली आहे. 'आता इस्त्रोने जळलेले कपडे 'या' ब्रँडचे आहेत असे सांगता येईल' अश्या अनेक विनोदी कमेंट्स या ब्रॅण्डची खिल्ली उडवत आहेत.
9/11
महागड्या ब्रॅंडकडून अश्या क्रिएटिव्हिटी सादर करणं हे काही पहिल्यांदाच नाही. फाटलेले शूज, मळकट कपडे बाजारात आधीपासून हे ब्रॅण्ड्स आणत असतात.
10/11
फॅशन तज्ज्ञांच्या मते, हे ब्रँड्स 'एक्सक्लुझिव्हिटी'च्या नावाखाली ग्राहकांच्या मानसिकतेशी खेळत आहेत.
11/11
तसेच फॅशनच्या नावाखाली जळालेले, फाटके कपडे मार्केट मध्ये आणून हे ब्रँड डॉलर्समध्ये कमवत आहेत असा संतापही अनेक यूजर्स व्यक्त करत आहेत.
Published at : 22 Feb 2026 12:49 PM (IST)