Sleep Routine For Hair : झोप कमी घेताय? सावध रहा, यामुळे केस गळती वाढू शकते!
Sleep Routine For Hair : अपुर्या झोपेमुळे शरीरात ताण वाढतो, रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.
Continues below advertisement
Sleep routine for hair
Continues below advertisement
1/8
आजच्या धावपळीच्या जीवनात ताण आणि मोबाईलमुळे झोप कमी होते. झोपेअभावी फक्त थकवा नाही, तर शरीर आणि मनावरही परिणाम होतो.
2/8
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही, तर केस गळू लागतात. तज्ञ सांगतात, चांगली झोप शरीरासोबतच केसही मजबूत ठेवते. चला जाणून घेऊया झोपेअभावी केस गळण्याचं कारण काय असतं.
3/8
केसांना पोषण आणि विश्रांती झोपेमधून मिळते. गाढ झोप घेतल्यावर शरीर दुरुस्तीच्या स्थितीत जातं, त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. झोप कमी झाली तर मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात.
4/8
झोपेअभावी शरीरात ताण वाढतो. त्यामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो आणि केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.
5/8
झोप कमी झाल्याने टाळू कोरडी किंवा तेलकट होते. त्यामुळे कोंडा, खाज आणि जळजळ होते, आणि मुळे कमकुवत होतात.
Continues below advertisement
6/8
दररोज 7- 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. नियमित झोप आणि ठरलेली दिनचर्या केस आणि शरीर दोन्हींसाठी चांगली असते.
7/8
झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहा, हलकं जेवण करा आणि ध्यान योग करा. पुरेशी झोप घेतल्याने केस मजबूत राहतात आणि चेहरा ताजातवाना दिसतो.
8/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 07 Nov 2025 02:55 PM (IST)