Home Cleaning Tips : घरातील 'या' गोष्टी योग्य वेळी बदला, अन्यथा होईल नुकसान...
Home Cleaning Tips : आपल्या घरातील काही गोष्टी लवकरात लवकर बदलल्या नाही तर त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

Home Cleaning Tips
1/7
आपल्या घरातील काही गोष्टी लवकरात लवकर बदलल्या नाहीत तर त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
2/7
आपण बऱ्याचदा आपल्या घरातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण, यामुळे काय घडू शकतं हे आपल्याला माहितं नसतं. चला तर जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल.
3/7
घरात वापरला जाणारा बर्फाचा ट्रे जर प्लास्टिकचा असेल तर तो दोन वर्षांपेक्षा जास्त वापरू नये कारण त्यावर आलेले स्क्रॅच आणि क्रॅकवर अनेक बॅक्टेरिया असू शकतात.
4/7
तसेच जर तुम्ही रियूजेबल वॉटर बॉटल्स वापरत असाल तर या बॉटल्स 6 महिन्यांच्या आत बदलून घ्यावा. कारण रोज धुतल्यानंतरही त्या पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत.
5/7
त्याऐवजी तुम्ही स्टेनलेस स्टील बॉटल्सचा वापर करावा.
6/7
प्रत्येकाच्या घरात बेडशीट्स वापरले जात असून या बेडशीट्स दीर्घकाळ वापरल्या जातात. मात्र रोज वापरल्या जाणाऱ्या या बेडशीट्स 2 ते दिवसांत बदलणं गरजेचं असतं.
7/7
तसेच तुम्ही जर रीयूजेबल ग्रॉसरी बॅग्स वापरत असाल आणि जर या बॅग्सला कोणताही दुर्गंध येत असेल त्या बॅग्स लवकरात लवकर बदलून घ्याव्यात.
Published at : 18 Feb 2026 11:17 AM (IST)