Foreign Destination : कमी खर्चात करायचा आहे परदेशात प्रवास, तर या ठिकाणी नक्की जा...
व्हिएतनाम (Vietnam): कमी खर्चात फिरता येणाऱ्या देशांमध्ये व्हिएतनाम समावेश आहे. येथे तुम्ही तुमची सुट्टी अगदी तुमच्या बजेटमध्ये पूर्ण करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुंदर दृश्ये, स्वादिष्ट पदार्थ, अद्वितीय संस्कृती येथे पाहण्यासारखी आहे. येथील हनोई, हो ची मिन्ह, हॅलोंग बे ही शहरे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात.
मोरोक्को (Morocco): कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्यासाठी मोरोक्को हे खूप चांगले ठिकाण आहे. येथील समृद्ध इतिहास आणि संस्कृती खूपच सुंदर आहे.
मॅराकेच आणि फेस सारखी शहरे पर्यटकांना आवडतात. सहारा वाळवंटाला भेट देण्यासाठी पर्यटक याठिकाणाला भेट देतात.
मेक्सिको (Mexico):उन्हाळ्यात मेक्सिकोला जाणे खास ठरेल. येथील सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन अवशेष आणि स्वादिष्ट पाककृती तुमची सुट्टी मजेदार बनवतील.
इथली हॉटेल्स खूप स्वस्त आहेत आणि कमी पैशात तुम्ही कॅनकून, टुलम किंवा मेक्सिको सिटीला भेट देऊ शकता.
कोस्टा रिका (Costa Rica): कोस्टा रिका उष्णकटिबंधीय नंदनवनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही तुमची उन्हाळी सुट्टी घालवू शकता.
हायकिंग, सर्फिंग आणि झिप-लाइनिंगसह विविध गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येईल. हिरवीगार जंगले, ज्वालामुखी आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.
पोर्तुगाल (Portugal): जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशात जायचे असेल तर तुम्ही पोर्तुगाल निवडू शकता. इथली गावं तुम्हाला खूप आकर्षित करतील, जेवणाची चव तुमच्या मनाला भुरळ घालेल.
येथे वस्तू खूप स्वस्त आहेत. पोर्तुगालमधील लिस्बन हे ऐतिहासिक शहर खूप सुंदर आहे. आल्गारवे परिसरातील सुंदर समुद्रकिनारे नजरेच्या टप्प्यात भरतात.