Health Tips : भाजी खाण्याचा कंटाळा येतो? 'या' 7 पदार्थांचं सेवन ठरेल फायदेशीर
Health Tips : तुम्हाला भाज्या खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही या 7 पदार्थांचं सेवन आवर्जून करावं ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते.

Health Tips
1/9
पालेभाज्या म्हटलं तर अनेकांना भूकच लागत नाही. अनेकजण पालेभाज्या खाणं टाळतात. मात्र, या पालेभाज्यांमध्ये असलेलं फायबर आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे.
2/9
अनेकजण ओट्सचं सेवन नियमितपणे करतात. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. तसेच, ओट्स कॉलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे ओट्सचं सेवन आपल्यासाठी महत्वाचं ठरेल.
3/9
चिया सीड्स हे दिसायला अत्यंत लहान असले तरी केवळ 2 चमचे चिया सिड्समध्ये 10 ग्रॅम फायबर उपलब्ध असतं. त्यामुळे चिया सीड्सचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल.
4/9
आपल्या घरात नेहमी उपलब्ध असलेल्या डाळी हा एक पौष्टिक पर्याय आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असल्यामुळे उत्तम आरोग्यासाठी डाळीचं सेवन करणं महत्वाचं आहे.
5/9
डाळीबरोबरच हरभराही घरात उपलब्ध असतो. हरभऱ्यात 12 ग्रॅम फायबर उपलब्ध असते. त्यामुळे, आपल्या शरीरातील फायबरची कमतरता दूर करण्यासाठी तुमच्या आहारात हरभऱ्याचा समावेश करा.
6/9
नासपती या फळात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे नासपतीचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरणार आहे.
7/9
काळा राजमा हा पदार्थही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे काळा राजमाचं सेवन केल्याने आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं.
8/9
एवोकॅडोला अनेकजण भाजी म्हणतात. पण, हे एक आरोग्यदायी फळ असून एवोकॅडोला फायबरचा खजिना म्हटलं जातं. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असून एवोकॅडोचं सेवन आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Mar 2026 11:50 AM (IST)