Health Tips : कच्ची पपईमध्ये आहेत अनेक गुणधर्म; जाणून घ्या फायदे

Raw Papaya
1/8
पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेली अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने शरीराशी संबंधित बरेच गंभीर आजार बरे होतात.
2/8
महिलांनीही कच्च्या पपईचा आहारात समावेश करावा. यामुळे मासिक पाळीच्या त्रासात आराम मिळतो. याशिवाय कच्ची पपईचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.
3/8
पपई खाल्ल्याने शरीराला गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. पिकलेली पपई तुम्ही फळ म्हणून खाऊ शकता. दुसरीकडे, तुम्ही कच्च्या पपईपासून अनेक प्रकारच्या भाज्या बनवून खाऊ शकता.
4/8
पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स आढळतात, जे पोटाच्या समस्या दूर करतात. कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी खनिजे आढळतात. अशा परिस्थितीत पपईचे सेवन जरूर करावे. विशेषतः महिलांनी आपल्या आहारात पपईचा समावेश जरूर करावा. महिलांना पपई खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
5/8
कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते.
6/8
कच्ची पपई खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी येण्याच्या त्रासात आराम मिळतो. यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते ज्यामुळे वेदना कमी होते.
7/8
कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 22 Jun 2022 08:29 PM (IST)