Health Tips : वारंवार आजारी पडताय? शरीरात 'या' व्हिटॅमिन्सची आहे कमतरता, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Health Tips : वारंवार आजारी पडतंय? व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे कारणीभूत. शरीराला हवंय कमीत कमी 75mg व्हिटॅमिन सी

Health Tips
1/8
निरोगी जीवनासाठी आपल्याला अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. त्यापैकी एक व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते, जखम भरून काढण्यात मदत करते. त्वचेची काळजी घेते.
2/8
नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ (NIH) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन सी चा अभाव आहे आणि त्यामुळे ते सतत आजारी पडतात. तसेच जर्नल ऑफ अकॅडमी ऑफ बायोमेडिकल सायन्स (JABS) च्या अनुसार भारतातील किमान 30% लोकांमध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे. 'पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स वन' अनुसार उत्तर भारतात 74% आणि दक्षिण भारतात 46% लोकांमध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्याचे आढळते.
3/8
व्हिटॅमिन सी हे एक वॉटर सोल्युशन व्हिटॅमिन आहे जे शरीरात स्वतः निर्माण होत नाही, तर ते आपल्याला आहारातून, फळांतून मिळत असते.
4/8
आंबट गुणधर्म असलेली फळे आवळा, अननस, संत्री, किवी, ब्रोकोली अशा फळांचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते.
5/8
शरीराला कमीत कमी 75-90 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते. पण, वयानुसार याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ (NIH) अनुसार तान्ह्या बाळांना 40-50 मिलिग्रॅम, तरुण मुलांना 67-75 मिलिग्रॅम, वयस्कर व्यक्तींना 75-90 मिलिग्रॅम, गरोदर स्त्रियांना 80-85 मिलिग्रॅम तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना 115-120 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते.
6/8
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे वारंवार थकवा येणे, सतत आजारी पडणे, त्वचा कोरडी पडणे, हिरड्यांमधून रक्त येणे, भूक कमी लागणे आणि एनिमिया असे आजार होऊ शकतात.
7/8
व्हिटॅमिन सी औषधांच्या रूपात सुद्धा घेऊ शकतो पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने. जर व्हिटॅमिन सी च्या औषधाची मात्रा शरीरात वाढली तर अपचन तसेच किडनी स्टोन होण्याची शक्यता असते, त्यामुळे पोषक आहार, फळे यांचे सेवन दैनंदिन जीवनात करणे कधीही फायदेशीर ठरेल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 26 Dec 2025 03:33 PM (IST)