Health Tips : हिवाळ्यात भरपूर हिरवीगार कांद्याची पात खा; आश्चर्यकारक फायदे मिळतील
हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या कांद्यामध्ये असे अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात जी हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर मानली जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर : कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिज लवण मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या टाळतात.
हाडांसाठी फायदेशीर: कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.
पचनसंस्था निरोगी राहते: कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते.
हृदयासाठी फायदेशीर : कांद्याच्या पातीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे अनेक आजार होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत: कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.