चपाती भाजी खाल्ल्याने शुगर वाढते? मधुमेही रुग्णांनी 'ही' काळजी घ्या
भारतीय अन्न परंपरेत प्रेम असले तरी, मधुमेह नियंत्रणासाठी संतुलित आहार, जसे की २ चपात्या, भाज्या, डाळ, थोडे दही, कमी साखर व प्रक्रिया केलेले अन्न टाळणे, आणि नियमित चालणे महत्त्वाचे आहे.

chapati bhaji
1/11
बहुतेक भारतीय घरांमध्ये, अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही तर ते परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक आहे.
2/11
पण, आजकाल दिवसेंदिवस डायबेटीसचं प्रमाण वाढत असल्यामुळे लोकांना असा प्रश्न पडतोय की चपाती-भाजी खाल्ल्यानेसुद्धा शुगर वाढते का?
3/11
काही लोक फक्त ओट्स आणि डाळी खातात. भात खाणं शक्यतो टाळतात. पण हे पुरेसे आहे का? चपाती-भाजी खाल्ल्याने साखर वाढते का, चला जाणून घेऊया .
4/11
भारतीय जेवण हे साधं दिसत असलं तरी त्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात. भात, पोळी, भाज्या आणि चहात साखरेचं प्रमाण जास्त असतं.
5/11
ही समस्या खेड्यांपेक्षा शहरांमध्ये जास्त आढळते. कारण शहरातील लाईफस्टाईल ही बैठी असल्यामुळे येथील लोकांना लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवतात.
6/11
खरंतर, चपाती -भाजीसुद्धा आपली शुगर लेव्हल वाढवू शकते. पण, जर तुम्ही संतुलित आहार जसे की, 2 चपात्या, डाळ, भाज्या आणि थोडं दही खाल्ल्यास हे प्रमाण नियंत्रित राहू शकते.
7/11
त्याचबरोबर बाजरी, ज्वारी आणि व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स तसेच, मल्टीग्रेन पीठ वापरल्यास हे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
8/11
ताण किंवा जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने आतड्यांचे संतुलन बिघडते आणि साखर, पचन आणि वजनावर परिणाम होतो.
9/11
साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, डायबेटीस रुग्ण सकाळी कोमट पाणी आणि भिजलेले मणुके, बदाम यांचं सेवन करु शकतात. तसेच, रात्रीच्या जेवणानंतर 10-15 मिनिटांचा वॉकही गरजेचा आहे.
10/11
तर, गोड चहा, मिठाई आणि शुगरशी संबंधित पदार्थांपासून दूरच राहा. या व्यतिरिक्त मधुमेही रुग्णांनी तणाव कमी करण्याचा देखील प्रयत्न करावा.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 11 Oct 2025 05:33 PM (IST)