एक्स्प्लोर
Health Tips : 'ही' फळं सोलून खाण्याची चूक करू नका; अन्यथा शरीराला फायदे मिळणार नाहीत
Health Tips : अशी काही फळे आहेत ज्यांच्या सालीमध्ये जास्तीत जास्त पौष्टिकता दडलेली असते.

Fruits
1/8

फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यातून अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. मात्र, ही पोषकतत्त्वे मिळविण्यासाठी फळे योग्य प्रकारे खाणे आवश्यक आहे.
2/8

फळे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्यापासून शरीराला योग्य पोषण मिळत नाही. फळांपासून पोषक तत्त्वे मिळविण्यासाठी, ते खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
3/8

अनेकजण फळे सोलून खातात. खरंतर, सर्व फळांची साल खराब नसते. अशी काही फळे आहेत ज्यांच्या सालीमध्ये जास्तीत जास्त पौष्टिकता दडलेली असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, जे सालीसह खाल्ले जाऊ शकतात.
4/8

या यादीत नाशपाती हे पहिले नाव आहे. नाशपाती सोलून खाण्याची चूक कधीही करू नका. कारण त्याच्या सालीमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट आढळतात.
5/8

पेरू हेही असेच एक फळ आहे. पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांबरोबरच अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरही चांगल्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच ते सोलून खाऊ नये.
6/8

सफरचंद कधीही सोलून खाऊ नये. कारण त्यात जीवनसत्व, फायबर आणि अॅंटिऑक्सिडेंट्स असतात.
7/8

चिकूचे सेवन सालीसोबतही करावे. जर तुम्ही या फळाची साल काढून सेवन करत असाल तर तुम्हाला त्यातील पौष्टिक घटक मिळणार नाहीत. कारण चिकूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
8/8

किवी खाण्याआधीही लोक अनेकदा ते सोलून काढतात. किवीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
Published at : 13 Jul 2023 02:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
