Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा सॉफ्ट आणि सुंदर ठेवण्यासाठी 'या' चुका टाळा
उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर उन्हाळा हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही. कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच पण त्वचाही खराब होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. पण, यापासून देखील तुम्ही आपलं संरक्षण करु शकता. टॅनिंग, सनबर्न आणि अॅलर्जीसारख्या समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात या चुका करणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात या 5 चुका करु नका
दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणे : काही लोक दिवसातून फक्त एकदाच सनस्क्रीन लावतात आणि तीच दिवसभर ठेवतात. असे केल्याने त्वचेचे संरक्षण होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावावी.
मॉईश्चरायझिंग न करणे : तुमची त्वचा तेलकट आणि चेहऱ्यावर पिंपल्स असले तरीही तुम्ही मॉईश्चरायझर लावलेच पाहिजे. कारण ते त्वचेतील पाणी लॉक करते, त्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. तुम्ही हायड्रेटिंग मॉईश्चरायझर वापरावे, ज्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड आणि नियासिनमाइड सारखे घटक असतात.
भरपूर मेक-अप करणे : जर तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर हलका मेकअप हा एक चांगला पर्याय असेल. कारण फाऊंडेशन, कन्सिलर आणि कॉन्टूर यांसारख्या जड मेकअपमुळे त्वचेतील पोर्स बंद होतात.
एक्सफोलिएटिंग न करणे : एक्सफोलिएशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे आवश्यक आहे, कारण ते पोर्स रोखू शकतात. ग्लायकोलिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, मॅंडेलिक अॅसिड किंवा बेंझॉयल पॅरॉक्साईड यांसारखे कोणतेही एक्सफोलिएटिंग घटक वापरण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या.
स्वत:ला हायड्रेट न ठेवणे : उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. हंगामी फळे खाऊन आणि दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिऊन तुम्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहू शकता. स्वतःला हायड्रेट ठेवल्यासच उष्माघात टाळता येऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.