Health Tips : हिवाळ्यात मद्यपान करत असाल तर सतर्क राहा, जाणून घ्या कारण !
हिवाळ्यात बरेच लोक जास्त मद्यपान करतात. मात्र मद्यपान केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि अशा परिस्थितीत लोक थंड हवामानात जास्त मद्यपान करू लागतात, असे अनेकांचे मत आहे. पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हीही हिवाळ्यात जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे कारण या ऋतूत जास्त मद्यपान केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो . (Photo Credit : pexels )
हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी जास्त होऊ लागतो. (Photo Credit : pexels )
त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. इतकंच नाही तर हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेग फुटण्याचा धोका वाढतो. प्लेग फुटणे आणि रक्ताच्या गुठळ्या हृदयविकाराच्या झटक्याची कारणे मानली जातात. (Photo Credit : pexels )
हिवाळ्यात मद्यपान केल्याने काही काळ शरीर उबदार होते, पण काही काळानंतर शरीर खूप थंड होते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Photo Credit : pexels )
त्यामुळे हिवाळ्यात जास्त मद्यपान करणे टाळावे. विशेषत: ज्या लोकांचा रक्तदाब जास्त आहे आणि जे हृदयरुग्ण आहेत, त्यांनी या ऋतूत अल्कोहोलपासून दूर राहावे. (Photo Credit : pexels )
तसेच हिवाळ्यात वृद्धांनीही शरीराची विशेष काळजी घ्यावी. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे. थंड पाणी पिणेही टाळावे . (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )