Benefits of Coriander : कोथिंबीर ठरते आरोग्यसाठी गुणकारी; 'या' आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. याचे रोज सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. तथापि, काही भाज्या अशा आहेत ज्यांचे फायदे बहुतेक लोकांना माहित नाहीत. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक भाज्या अशा आहेत ज्यांचे सेवन लोक किती तरी वर्षांपासून करत आहेत पण, आपल्याला त्याचे फायदे माहित नासतात. पल्या पूर्वजांनीही या भाज्या मोठ्या उत्साहाने खाल्ल्या. (Photo Credit : Pixabay)
या भाज्यांचे गुणधर्म आयुर्वेदातही सांगण्यात आले आहेत. या पैकीच एक म्हणजे कोथिंबीर आहे. अनेक जण कोथिंबिरीचा वापर हा भाज्यांमध्ये चव येण्यासाठी करता. जाऊन घ्या याचे फायदे. (Photo Credit : Pixabay)
कोथिंबीरीची पाने हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. ह्यांचे सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे अन्नात कोथिंबीर घालावी. (Photo Credit : Pixabay)
या पानांचा स्वभाव थंडावा देणारा असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर मानले जातात.(Photo Credit : Pixabay)
जाणून घ्या कोणत्या आजरांवर कोथिंबीर फायदेशीर ठरते ते. (Photo Credit : Pixabay)
हिरव्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण भरपूर असते. हे व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारात तुम्ही कोथिंबीरचा समावेश करू शकता ज्यामुळे, तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकेल.(Photo Credit : Pixabay)
कोथिंबीरीत असलेले हे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन C चा ही समावेश आहे. कोणत्याही जंतू संसर्गापासून आपल्या शरिराला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन C करते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास कोथिंबीर लाभदायी ठरते.(Photo Credit : Pixabay)
पोटाच्या विविध समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते. तसेच, पचनक्षमता सुधारण्यात कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, नियमितपणे कोथिंबीरचा आहारात समावेश केल्याने पचनक्षमता सुधारते. अपचन, गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर मदत करते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)