Natural Hair Dye : या नैसर्गिक पद्धतीने केस रंगवा केस, चमकदार आणि सुंदर दिसतील!
चला तर मग जाणून घेऊया हेअर डाय शिवाय काळ्या केसांचे सौंदर्य कसे टिकवता येते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेअर डाईमध्ये अमोनिया, पेरोक्साईड, पी-फेनिलइंडियामाइन सारखी रसायने मिसळली जातात. या रसायनांमुळे केसांचा रंग तर बदलतोच पण यामुळे खाज सुटणे, डाग आणि गंभीर आजारही होऊ शकतात. जे लोक केसांना कायमस्वरूपी हेअर डाई लावतात त्यांना इतरांपेक्षा विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.(Photo Credit : pexels )
केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी प्राचीन काळापासून मेहंदीचा वापर केला जात आहे. मेहंदी केसांना रंग तर देतेच पण त्यांचे पोषणही करते.(Photo Credit : pexels )
आवळा आणि रीठा : हे दोन्ही नैसर्गिक घटक केसांसाठी खूप चांगले असतात. आवळ्यामुळे केस गडद काळे होतात आणि रीठा त्यांना स्वच्छ करते.(Photo Credit : pexels )
कॉफी आणि चहाचे पाणी: कॉफी आणि चहाचे पाणी देखील नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास मदत करू शकते.(Photo Credit : pexels )
शिकाकाई : शिकाकाईच्या वापराने केसांना नैसर्गिक रंग ही मिळतो आणि ते मजबूतही होतात.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )