वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या घसेदुखीवर 'हा' घरगुती रामबाण उपाय, नक्की करून पाहा!
सध्या दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात वायू प्रदूषणाने कहर केला आहे. या वायू प्रदूषणापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य तज्ञांच्या मते, बाहेर जाण्यापूर्वी मास्क घालणे किंवा काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.(Photo Credit : Unsplash)
वायू प्रदूषण टाळण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा देखील वापर करतात. असाच एक पदार्थ म्हणजे गूळ (Jaggery). गूळ वायू प्रदूषणामुळे घशात होणाऱ्या खवखवण्यापासून आराम मिळवून देतो असा दावा करण्यात आला आहे. (Photo Credit : Unsplash)
वायू प्रदूषणामुळे होणारा घशाचा त्रास आणि खोकला कमी करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा गुळाचा एक छोटा तुकडा तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर एक ग्लास पिऊ शकता. (Photo Credit : Unsplash)
नैसर्गिक गूळ हा पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.(Photo Credit : Unsplash)
नैसर्गिक गूळ घसा साफ करण्यास मदत करतो. गुळामुळे वायू प्रदूषणातील सर्व विषारी रसायने खाण्यापासून वाचवू शकते.(Photo Credit : Unsplash)
घसा आणि फुफ्फुसांसाठी नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करते आणि संक्रमण टाळण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.(Photo Credit : Unsplash)
गूळ वायुमार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करतो. याव्यतिरिक्त, गुळातील अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुसांना प्रदूषकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.(Photo Credit : Unsplash)
नैसर्गिक गुळाचे आतड्यांसाठी इतर आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कारण ते बद्धकोष्ठता, अपचन आणि आम्लपित्तापासून मुक्त होण्यास मदत करतात. (Photo Credit : Unsplash)
जर तुम्ही कोमट पाण्यात तुळशीची पाने आणि आलं घातलं तर ते तुमच्या संपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. यामुळे खाज आणि खोकल्यापासून आराम तर मिळतोच पण तुमची पचनशक्तीही चांगली राहते. हे मिश्रण तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा खाऊ शकता. (Photo Credit : Unsplash)