एक्स्प्लोर
Gopalkala : गोपाळकाल्यात वापरल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्यांचे फायदे माहितीयेत?
jowarichya lahya : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण देशभरात उत्सहाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान कृष्णाला आवडणारा खास गोपाळकाला हा प्रसाद म्हणून केला जातो. हा प्रसाद प्रत्येक घरात आवर्जून बनवला जातो.
JANMASHTAMI-GOPALAKALA 2025
1/11

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण देशभरात उत्सहाने साजरा केला जातो.
2/11

या दिवशी भगवान कृष्णाला आवडणारा खास गोपाळकाला हा प्रसाद म्हणून केला जातो.
3/11

गोपाळकाला तयार करताना पोहे, साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या, ओलं खोबरं, डाळी, शेंगदाणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि दही वापरलं जातं.
4/11

हा प्रसाद प्रत्येक घरात आवर्जून बनवला जातो.
5/11

काही ग्रंथ आणि कथेनुसार , लहानपणी श्रीकृष्णला दही-लोणीप्रिय होतं
6/11

त्यामुळे दहीहंडीच्या वेळी दह्यासोबत हा गोपाळकाला भरून हंडी फोडण्याची परंपरा आहे.
7/11

पावसाळ्याच्या दिवसात पोहे आणि लाह्यांसारखे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
8/11

दमट हवामानात हे पदार्थ हलके आणि पटकन पचणारे असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व दिल आहे. आपल्या संस्कृतीत नागपंचमी आणि दहीहंडीला या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
9/11

ऊर्जा वाढवतात : लहान मुले, वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि कुपोषित व्यक्तींसाठी ज्वारीच्या लाह्या उपयुक्त ठरतो. हलके असल्यामुळे पचायला सोप्पे आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या ठरतात. याचा चिवडा किंवा खीर बनवून खाल्ल्यास आपल्या शरीराला ताकद मिळते.
10/11

पित्त कमी करतात : ऍसिडिटी, पोटात जळजळ, छातीत त्रास किंवा डोकं जड होणं अशा आजरांवर ज्वारीच्या लाह्या खाल्याने लवकर अराम भेटत.
11/11

वजन कमी करण्यात मदत : या लाह्या ऊर्जा टिकवून ठेवतात ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि अन्न देखील कमी खाल्लं जातं. ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्या लोकांसाठी ज्वारीच्या लाह्यांचा नाश्ता उत्तम ठरेल.
Published at : 13 Aug 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
























