Religious Places : Gen-Z, मिलेनियल्स पिढीलाही 'या' धार्मिक स्थळांची भूरळ! का ठरतेय पहिली पसंती?
Religious Places : आजची युवा पिढी निसर्ग, अध्यात्म आणि संस्कृतीच्या मनाला लागणारी शांतता या ठिकाणी मिळते.

Religious Places
1/8
डिजिटल डिटॉक्ससाठी आजचे तरुण मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक स्थळांकडे वळत आहेत. करिअरच्या धावपळीबरोबरच मानसिक शांतता मिळवण्यासाठी अध्यात्म हे युवकांचे नवीन आकर्षण बनले आहे.
2/8
धार्मिक स्थळे ही केवळ परंपरेची जागा नसून मनःशांतीची ठिकाणे म्हणून पाहिली जात आहेत. अनेक तरुण धार्मिक प्रवासाला ‘स्पिरिच्युअल ब्रेक’ म्हणून स्वीकारत आहेत.
3/8
वाराणसीची गंगा आरती तरुणांना दिव्यता आणि शांततेचा अनोखा अनुभव देतात. वाराणसीतील घाटांवरील वातावरण मन शांत करण्यास मदत करतं.
4/8
ऋषिकेशमध्ये योग आणि ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी युवकांची मोठी गर्दी दिसते. गंगेच्या किनाऱ्यावर बसून ध्यान करणे अनेक तरुणांसाठी मानसिक विश्रांतीचे साधन झाले आहे
5/8
स्वर्ण मंदिरातील सेवा आणि शिस्त तरुणांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. लंगरात सेवा करण्याचा अनुभव तरुणांना नम्रतेचे खरे मूल्य शिकवतो.
6/8
पुष्करचे ब्रह्मा मंदिर त्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वलयामुळे युवकांना आकर्षित करते. पुष्करमध्ये धार्मिकता आणि आधुनिक कॅफे संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
7/8
तिरुपतीचे दर्शन तरुणांना शिस्तबद्धतेची जाणीव करून देते. तिरुपतीतील आधुनिक टेक-सॅवी सुविधा युवकांना अधिक सोयीस्कर वाटतात.
8/8
बोधगयातील महाबोधी मंदिर ध्यानासाठी आदर्श ठिकाण मानले जाते.बोधगयातील शांत वातावरण मनाला अंतर्मुख होण्याची संधी देते.
Published at : 20 Nov 2025 01:38 PM (IST)