Winter Special Laddu Recipe : हिवाळ्यात खा 'हे' 3 घरगुती लाडू चवही मस्त आणि आरोग्यही जबरदस्त!

Winter Special Laddu Recipe : हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी काजू-बदाम, डिंक आणि तीळाचे पौष्टिक लाडू बनवा, जे शरीराला उब आणि ऊर्जा देतात.

Continues below advertisement

Winter Special Laddu Recipe

Continues below advertisement
1/8
या हिवाळ्यात काहीतरी चविष्ट आणि आरोग्यदायी खायचंय का? चला, तीन सोप्या आणि पौष्टिक लाडूंच्या रेसिपीज जाणून घेऊया, ज्या चविष्ट तर आहेतच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
2/8
थंडीत सर्दी खोकला होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराला उब मिळेल असं काहीतरी खाणं महत्त्वाचं आहे.
3/8
काजू बदाम, डिंक आणि तीळाचे लाडू हे हिवाळ्यात उत्तम पर्याय आहेत. हे लाडू शरीराला उष्णता देतात आणि ऊर्जा वाढवतात.
4/8
डिंकमध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रथिने असतात, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि शरीराला उब मिळते. हे बनवण्यासाठी, डिंक भाजून घ्या. नंतर त्यात गूळ, मनुका आणि बदाम मिसळा. थंड झाल्यावर लाडू तयार करा.
5/8
तीळात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन असतात. ते हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतात. हे लाडू बनवण्यासाठी, तूपात तीळ भाजा, नंतर गूळ वितळवा आणि त्यात तीळ मिसळा. थंड झाल्यावर लाडू तयार करा.
Continues below advertisement
6/8
मेथीचे लाडू शरीराला उब देतात आणि पाठदुखी, सांधेदुखीपासून आराम देतात. ते वजन कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हे लाडू बनवण्यासाठी, मेथी भाजून घ्या, नंतर त्यात गूळ आणि तूप घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर लाडू तयार करा.
7/8
हे सर्व लाडू हिवाळ्यात शरीराला ऊर्जा, उब आणि चव देतात म्हणजेच टेस्ट आणि हेल्थ दोन्हींचा संगम.
8/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola