Copper benefits: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं खरंच फायदेशीर ठरत का ?
धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानलं जातं त्यातही तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजलं जातं. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचं तुम्हाला माहित आहे. पण असं केल्यास आरोग्याला नेमका काय फायदा होतो, हे तुम्हाला माहित आहे का?Photo credit: Unsplash
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं. Photo credit: Unsplash
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं. 3. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. Photo credit: Unsplash
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. Photo credit: Unsplash
पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. Photo credit: Unsplash
शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.Photo credit: Unsplash
अॅनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने फायदा होतो. Photo credit: Unsplash
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड्या, तारुण्यापीटिका तसंच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते. Photo credit: Unsplash
तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवतं. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते.Photo credit: Unsplash
तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरतं.Photo credit: Unsplash
Photo credit: Unsplash