आतापर्यंत आरोग्यदायी मानला जाणारा ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त विषारी निघाला? नक्की सत्य काय?
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यदायी आहे, परंतु ब्राऊन राइसमध्ये असलेले आर्सेनिक शरीराला किती नुकसान पोहोचवू शकते हे तुम्हाला कदाचित माहित नसेल.

ब्राऊन राइस
1/9
आर्सेनिक हा एक रासायनिक घटक आहे जो मानवी शरीरासाठी 'विष' म्हणून काम करतो.
2/9
त्याचा हृदय आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो.
3/9
विली ऑनलाइन लायब्ररीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्राऊन राइसमध्ये विषारी रसायनांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे, त्यामुळे ते खाण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे.
4/9
ब्राऊन राइसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण खूप जास्त असते. या अभ्यासातील संशोधकांनी तांदळाच्या नमुन्यांचा डेटा विश्लेषित केला आणि असे आढळून आले की तपकिरी तांदळामध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा २४% जास्त आर्सेनिक आणि ४०% जास्त इन-ऑरगॅनिक आर्सेनिक (जो एक कर्करोगजन्य पदार्थ आहे) असते.
5/9
या अभ्यासात असेही सुचवण्यात आले आहे की "ब्राऊन राइसच्या आर्सेनिकच्या संपर्कामुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना नकारात्मक परिणामांचा धोका जास्त असू शकतो," कारण ते प्रौढांपेक्षा त्यांच्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत जास्त अन्न खातात.
6/9
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बालपणात आर्सेनिकच्या संपर्कात आल्याने "तरुण प्रौढांच्या संज्ञानात्मक विकासावर नकारात्मक परिणाम होतो आणि मृत्युदर वाढतो."
7/9
आता प्रश्न असा पडतो की ब्राऊन राइस विषारी का असतो? ब्राऊन राइसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते कारण विषारी पदार्थ धान्याच्या बाहेरील थरांमध्ये जमा होतो आणि तो तसाच राहतो, तर प्रक्रियेदरम्यान पांढऱ्या तांदळातून तो काढून टाकला जातो.
8/9
याचा सरळ अर्थ असा की फायबर आणि पोषक तत्वांसोबतच, तपकिरी तांदळामध्ये आर्सेनिकचे प्रमाण देखील कमी नाही.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 15 Apr 2025 04:47 PM (IST)