स्त्रियांनी पाळीच्या काळात नक्की खावा असा आहार; जाणून घ्या!
पाळीच्या काळात खाण्याचं लक्ष ठेवणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. हलका, पौष्टिक आणि नैसर्गिक आहार घेतल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास खूपच कमी होतो.

स्त्रियांनी पाळीच्या काळात नक्की खावा असा आहार; जाणून घ्या! |
1/8
पाळीच्या काळात (मासिक पाळी/menstrual cycle) अनेक महिलांना थकवा, पोटदुखी, चिडचिड, मळमळ, अशक्तपणा जाणवतो.
2/8
योग्य आहार घेतल्यास हे त्रास काही अंशी टाळता येतात. हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी काही पदार्थ या काळात खूप फायदेशीर ठरतात.
3/8
केळं पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे, हे मासिक वेदना कमी करतं
4/8
पालक, मेथी, चुकं, या भाज्यांमध्ये आयर्न आणि मॅग्नेशियम असतात, जे रक्तस्त्रावामुळे होणाऱ्या थकव्यावर मात करतात. या भाज्या रोजच्या जेवणात भाजी, पराठा किंवा सूप स्वरूपात वापरता येतात.
5/8
खजूरात लोह आणि नैसर्गिक साखर भरपूर असते, जे शरीराला ऊर्जा देतं आणि मूड सुधारतो.
6/8
बदाम, अक्रोड, तीळ, फ्लॅक्ससीड्स हे पाळीच्या काळात हॉर्मोन बॅलन्स करतात.मेगा-३ फॅटी अॅसिड्स वेदना आणि सूज कमी करतात.
7/8
हळद दूध, गुळ-आले सरबत, कढी, सूप हे शरीर उष्ण ठेवतात आणि पोट शांत करतं.
8/8
ग्रीन टी किंवा कॅमोमाईल टीसारख्या हर्बल टीज मूड सुधारण्यासाठी मदत करतात.
Published at : 30 Jul 2025 09:41 AM (IST)