PHOTO | कडाक्याच्या थंडीमुळं काश्मीर गोठलं; 30 वर्षांतील निच्चांकी तापमानाची नोंद
शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे.
पाणी गोठल्याने येथील नागरिकांचे जगणं काहीसं अवघड झाल्याचे चित्र आहे.
पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये तापमान शून्य ते 7 डिग्री सेल्सिअसहून कमी नोंदवण्यात आलं.
दक्षिण काश्मीरमधील एका रिसॉर्टमझ्ये तापमान शून्याहून कमी म्हणजेच, 11.1 डिग्री सेल्सिअसहून खाली नोंदवण्यात आलं. हे रिसॉर्ट जम्मू-काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण होतं.
श्रीनगरमध्ये आतापर्यंत सर्वात कमी तापमान 1893 मध्ये शून्यापासून14.4 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेलं होतं. काश्मिर खोऱ्यातील सर्वच भागांत खूप थंडी पसरली आहे.
1995 मध्ये श्रीनगरमध्ये तापमान शून्याहून खाली 8.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेलं होतं. तर 1991 मध्ये तापमान शून्याहून खाली 11.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं.
श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या 30 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीचा प्रकोप सुरुच आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध डल सरोवर आणि इतर अनेक सरोवरं, तलाव थंडीमुळे गोठले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे प्रसिद्ध डल सरोवरही गोठलं आहे. एवढचं नाहीतर, रस्त्यांवरही बर्फाची चादर पसरली आहे. तर पाईपमधील पाण्याचाही बर्फ झाला आहे. यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता की, काश्मीर खोऱ्यातील सध्याची परिस्थिती काय असले...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -