PHOTO | पहिल्या पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्यानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
करणवीर मेहरा आणि निधि सेठ एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.
त्याचा पहिला विवाह त्याची बालमेत्रिण देविका मेहरासोबत झाला होता. परंतु, काही दिवसांनी दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, करणवीरचा हा दुसरा विवाह आहे.
करणवीर आणि निधिने लग्नात केवळ 30 पाहुण्यांना निमंत्रण दिलं होतं.
लग्नावेळी करणवीर पर्पल शेड जॅकेटमध्ये दिसून आला. तर निधिने बेज कलरचा लेहेंगा वेअर केला होता.
करणवीर आणि निधि दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शुक्रवारी या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली होती आणि रविवारी हे दोघेही विवाहबद्ध झाले.
करणवीर मेहराने रविवारी निधि सेठसोबत दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये आपली लग्नगाठ बांधली. यावेळी करणवीरने निधीला उचलून घेऊन लग्नसोहळ्यासाठी गुरुद्वारामध्ये पोहोचला.
24 जानेवारी 2021 रोजी एकिकडे वरुण आणि नताशाचा दिमाखदार सोहळा पार पडत होता. तर दुसरीकडे आणखी एका अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत आपली लग्नगाठ बांधली. हा अभिनेता म्हणजे, करणवीर मेहरा.
करणवीर मेहरा आणि निधी सेठ या दोघांच्या सीक्रेट वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.