'या' 6 बॉलिवूड सेलिब्रिटींचं जन्मस्थळ परदेशात!
Amy Jackson : '2.0' आणि 'Singh Is Bliing' यांसारख्या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. ती एक ब्रिटीश नागरिक आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त एमीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Sunny Leone : सनी लियोनीने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनीचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तसेच बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्याआधी ती कॅनडामध्येच राहत होती.
Katrina Kaif : बॉलिवूडची चिकनी चमेली उर्फ कतरिना कैफची वडील काश्मिरी आणि आई ब्रिटीश आहे. कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिचं संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये शिफ्ट झालं होतं.
Jacqueline Farnandez : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा जन्म श्रीलंकेत झाला होता. जॅकलीनने 2009मध्ये बॉलिवूड चित्रपट 'अलादीन'मधून डेब्यू केला होता.
Imran khan : आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खानचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये झाला होता.
Deepika Padukone : या यादीत दीपिकाचं नाव पाहून हैराण झाला असाल. परंतु, दीपिकाचा जन्मही विदेशात झाला आहे. 5 जानेवारी 1986 मध्ये दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता.