Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ishant Sharma: जगातील सर्वात मोठ्या मैदानावर इशांत इतिहास रचणार, आज 100 वा सामना खेळणार
एका डावात 74 धावा देऊन 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इशांतने कसोटी सामन्याच्या डावात 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईशांतने भारतात खेळलेल्या 39 सामन्यात 103 विकेट्स घेतल्या आहेत. तर विदेशात खेळलेल्या 60 सामन्यात त्याने 199 विकेट घेतल्या आहेत.
इशांत शर्माने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात बांगलादेशविरूद्ध कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली होती. आतापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 302 विकेट्स घेतल्या आहेत.
इशांतने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील 300 विकेट्सही पूर्ण केल्या.
महान भारतीय अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटा सामना खेळणारा इशांत हा दुसरा वेगवान गोलंदाज असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज मैदानात उतरताच इतिहास रचणार आहे. इशांत मोटेराच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीचा 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाच ईशांता 100 वा सामना खेळणार आहे. याआधी ईशांतने महेंद्र सिंह धोनी, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वाचं संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
ईशांतने पिंक बॉलवर एकचा सामना खेळला आहे. बांगलादेशविरूद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इशांतने शानदार गोलंदाजी करत नऊ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्याने या पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 22 बाद 5 आणि दुसर्या डावात 56 धावांत 4 बळी घेतले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -