IPL 2021 Captain Salary: आयपीएलमध्ये संघांच्या कर्णधारांना किती मानधन मिळतं?
दिल्ली कॅपल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सर्व संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वात कमी पगार आहे. दोन वर्षांपासून तो दिल्लीचं नेतृत्व करत आहे. मागील हंगामात त्याने आपल्या नेतृत्वात दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत नेले. अय्यरला आयपीएल 2021 मध्ये 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 च्या लिलावात तो दिल्ली संघात आला होता, मात्र आयपीएल 2018 च्या लिलावात तो पुन्हा राजस्थान संघात परतला. राजस्थानने आयपीएल 2021 साठी सॅमसनला आपला कर्णधार बनवले आहे. या हंगामात त्याला आठ कोटी मिळतील.
इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने आयसीसी 2019 एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. इयान मॉर्गनला गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. आयपीएल 2021 मध्ये मॉर्गनला 5.25 कोटी रुपये मिळतील.
केएल राहुलला पंजाब किंग्जने आयपीएल 2020 मध्ये संघाचा कर्णधार बनवले. 2018 मध्ये राहुल या संघात आला होता. गेल्या तीन मोसमात राहुल आपल्या संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2021 मध्ये राहुलला 11 कोटी रुपये मिळतील.
डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा आघाडीचा फलंदाज आहे. या लीगमध्ये तीन वेळा सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली आहे. वॉर्नरला आयपीएल 2021 मध्ये 12.50 कोटी रुपये मिळतील.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने तीन वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला आयपीएल 2021 मध्ये 15 कोटी रुपये मिळणार आहेत.
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2021 मध्ये रोहितला 15 कोटी रुपये मिळतील.
विराट कोहली आयपीएलचा सर्वात महागडा कर्णधार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा भाग आहे. त्याला आयपीएल 2008 च्या लिलावात आरसीबीने अवघ्या 12 लाख रुपयांत विकत घेतल होतं. पण आयपीएल 2021 साठी कोहलीला 17 कोटी रुपये मिळणार आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -