PHOTO | वायूसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाचं शक्तीप्रदर्शन
आरकेएस भदोरिया यांनी आज बालाकोट हवाई हल्ल्याचा उल्लेख करताना सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमात हवाई दलाचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांनीही प्रथमच हवाई दलाचे प्रमुख म्हणून परेडची सलामी घेतली.
हवाई दलाच्या शूरवीरांची विविध प्रात्यक्षिकं दाखवून जगाला आपली शक्ती दाखवून दिली.
स्टेटिन डिस्प्लेमध्ये, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, टोही विमान आणि स्वदेशी रडार प्रणाली, रोहिणी देखील हिंडन एअरबेसवर पाहायला मिळाली.
यावेळी एकूण 56 विमानांनी हिंडन एअरबेसवर या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात राफेल, सुखोई, मिग 29, मिरज 2000, जग्वार आणि तेजस यांचा समावेश होता.
उत्तर प्रदेशच्या हिंडन एअरबेस येथे भारतीय वायुसेना दिन साजरा करण्यात आला.
भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 मध्ये झाली आणि दरवर्षी भारतीय हवाई दलाच्या स्थापनेच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.
आज भारतीय वायुसेना दिन आहे. यानिमित्ताने भारतीय वायुसेना आपला 88 वा स्थापना दिन साजरा करत आहे. देश आणि जगासमोर आपली हवाई शक्ती प्रदर्शित करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -