Independence Day 2020 | लाल किल्ल्यावर स्वातंत्र्योत्सव... पंतप्रधान मोदींच्या हस्ते सातव्यांदा ध्वजारोहण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरील सोहळा देखील खबरदारी घेत साजरा झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 15 ऑगस्ट अर्थात भारताचा स्वातंत्र्यदिन. यंदा भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिवस आहे.
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिंना आदरांजली वाहिली
यंदा कोरोनामुळे सगळीकडे हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टन्स राखत साजरा केला जात आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर अभियानाचाही उल्लेख केला. आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनल्याचं सांगितलं.
लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधताना मोदींनी सर्वात आधी कोरोना संकटात लढा देणाऱ्या कोरोना वॉरिअर्स नमन केलं.
यानंतर लाल किल्ला परिसरात पोहोचल्यानंतर सैन्याकडून पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
यानंतर लाल किल्ल्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
लाल किल्ल्यावरील यंदाच्या सोहळ्यात 800 ऐवजी 100 पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं. तसंच शाळकरी मुलं, सर्वसामान्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. याशिवास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्स पाळणं बंधनकारक केलं..
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -