Independence Day | देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, नियम पाळत ठिकठिकाणी ध्वजारोहण
सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहन करतांना पालकमंत्री बच्चू कडू.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
पालकमंत्री विश्वजित कदम यांनी भंडारा येथे ध्वजारोहण केले.
मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केलं
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील आदिवासी भागातील गिर्हेवाडी इथे झेंडावंदन केलं
मंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तहसील कार्यालयात ध्वजारोहण केले
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केलं
मंत्री आदित्य ठाकरे य़ांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केलं
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वजारोहण केले
राष्ट्रवादीच्या कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांनी ध्वजारोहण केलं
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण करित ध्वजास वंदन केले.
आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे.