✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In PICS | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल नऊ भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त

एबीपी माझा वेब टीम   |  12 Jan 2021 11:46 PM (IST)
1

हनुमा विहारी (Hanuma Vihar): तिसर्‍या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार,विहारीची दुखापत गंभीर आहे आणि आता तो काही महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामन्यात हनुमा विहारी खेळू शकणार नाही.

2

इशांत शर्मा (Ishant Sharma): राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये इशांत शर्मा फिटनेसवर काम करते आहे. तो दुखापतीमधून पुर्ण सावरल्यावर त्याचा भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर समावेश करण्यात येणार आहे. (Photo: Getty Images)

3

मोहम्मद शमी (Mohammed Shami) : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर झाल्याने शमी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. (Photo: AFP)

4

उमेश यादव (Umesh Yadav): मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी उमेश यादवच्या स्नायूला ताण आला होता. त्यामुळे त्यांच्या उपचार सुरु आहेत. मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांपूर्वी तो या दुखापतीतून सावरू शकणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. (Photo: AP)

5

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy): खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टी नटराजनला संधी देण्यात आली आहे. (Photo: @IPL /Twitter)

6

के एल राहुल (KL Rahul): भारताचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. नेट प्रॅक्टिसदरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळेच त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं. (Image: FILE PIC/AFP)

7

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja): भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता पुढील सामने खेळू शकणार नाही. सिडनीत सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळं जडेजा सिडनी कसोटीच्या दुसर्‍या डावातही फलंदाजी करू शकणार नाही. (Image: @BCCI/Twitter)

8

रिषभ पंत (Rishabh Pant): भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला दुखापत झाली असून ती गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पंतला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

9

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah):टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. जसप्रीत बुमराह पोटाच्या समस्येने त्रस्त आहे. (Photo Courtesy: Twitter)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • क्रीडा
  • In PICS | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल नऊ भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.