In Pics : सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात; 'या' कलाकारांना कोरोनाची लागण
बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत अर्जुनने ही माहिती दिली.
अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली.
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी, जेनेलिया देशमुख हिला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट तिनं स्वत:च शेअर केली.
गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं.
'यारीया' फेम हिमांश कोहलीला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे.
अभिषेक बच्चनला कोरोना विषाणूची लागण झाली होती. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं होतं.