In Pics: बनावट ईमेल प्रकरणात कंगना रनौत विरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी हृतिक रोशन आयुक्त कार्यालयात दाखल
तुम्ही पाहत असलेल्या छायाचित्रांमध्ये यावेळी हृतिक थोडा तणावात दिसत आहे. (Photo credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचदरम्यान कंगना रनौतने ट्विटरचा वापर करून नवीन वाद सुरू करण्याचा प्रयत्न करताना हृतिक रोशनला सिली एक्स म्हटले आहे. (Photo credit: Manav Manglani)
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृतिक रोशनच्या वकिलांनी प्रलंबित चौकशीबाबत मुंबई पोलिस आयुक्तांकडे संपर्क साधला होता, त्यानंतर ते गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी इंटेलीजेंस युनिटकडे वर्ग करण्यात आले होते. (Photo credit: Manav Manglani)
तेव्हापासून हृतिक आणि कंगना दोघांमध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 419 (व्यक्तीची तोतयागिरी करून फसवणूक) तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत कलम 66 सी (ओळख चोरी) आणि आयटी कायद्यांतर्गत कलम 66 डी (संगणकाद्वारे एखाद्याची ओळख चोरी करणे) अंतर्गत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Photo credit: Manav Manglani)
2016 साली हृतिकने एक खटला दाखल केला होता, ज्यात असे म्हटले होते की एका व्यक्तीने आपला बनावट ईमेल आयडी तयार करून कंगना रनौतला मेल केले होते. (Photo credit: Manav Manglani)
शनिवारी सायंकाळपर्यंत गुन्हे शाखेने हृतिक रोशनला आयुक्त कार्यालयाच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. पण तो ठरलेल्या वेळेपूर्वी पोहोचला. (Photo credit: Manav Manglani)
2016 च्या बनावट ईमेल प्रकरणात गुन्हे शाखेने हृतिकला समन्स बजावले होते. हृतिक वर 2016 साली आपली को-स्टार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिला बनावट ईमेल पाठविल्याचा आरोप आहे. (Photo credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला. याठिकाणी त्याचा जबाब नोंदविण्यात येणार होता. त्याला गुन्हे शाखेने आज हजर होण्यासाठी समन्स बजावले. (Photo credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -