Health Tips: जर तुम्ही आवळा खात असाल, तर मग त्यापासून होणारे नुकसान वाचा
आवळा मधुमेह रूग्णांसाठी चांगला मानला जातो. परंतु, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही ते सेवन केले पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर आपल्याला सर्दी किंवा इतर कोणत्याही संबंधित स्थितीचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत आपण आवळा सेवन करू नये.
काही लोकांना आवळ्याची अॅलर्जी असू शकते. या फळापासून अॅलर्जी असलेल्या व्यक्तीस पोटात पेटके, पोटदुखी, मळमळ, उलट्या, अतिसार आणि तोंडावर सूज येणे, खाज सुटणे, असे विकार होऊ शकतात. डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारख्या आरोग्याशी संबंधित काही तक्रारी असू शकतात.
आवळ्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास अतिसार आणि पोटाच्या इतर समस्या होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून, याचे नियंत्रित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
आवळा पोषक तत्वांनी समृद्ध फळ आहे. त्यामुळेचं आवळ्याला आरोग्यवर्धक म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा अनेक औषधी गुणधर्मांसाठी वापर केला जातो. मात्र, या सुपरफूडचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. चला जाणून घेऊया आवळ्याच्या काही दुष्परिणामांबद्दल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -