Happy Birthday Shahid : 'इश्क विश्क' ते 'कबीर सिंह'... शाहिद कपूरचा बॉलिवूडमधील 18 वर्षांचा प्रवास
2019 साली आलेला कबीर सिंह शाहिदचा सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात त्याने मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2018 मधील पद्मावत सिनेमातील रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी त्याचं कौतुक झालं. या सिनेमात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिक पदुकोन होती.
2016 साली आलेल्या उडता पंजाब सिनेमाता त्याने एका गायकाची भूमिका निभावली. या सिनेमासाठी शाहितला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेयर क्रिटिक पुरस्कार मिळाला होता.
2014 मध्ये आलेल्या हैदर सिनेमातील त्याच्या अभिनयाची सर्वांनीच वाहवा केली. या सिनेमासाठी शाहिदला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
2013 साली आलेले फटा पोस्टर निकला हीरो आणि आर.. राजकुमार दोन्ही सिनेमे सुरपहिट होते. दोन्ही सिनेमातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.
2009 साली आलेल्या 'कमीने' सिनेमातील त्याचा लूक हटके होता. या सिनेमात त्याचा डबल रोल होता.
2007 साली करिना कपूरसोबत शाहिदने 'जब वी मेट' सिनेमात काम केलं. त्यावर्षीचा तो सुपरहिट सिनेमा होता.
2006 मध्ये आलेल्या 'विवाह' सिनेमाता पुन्हा एकदा शाहिद आणि अमृताची जोडी मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळाली.
2006 साली आलेल्या चुप चुप के सिनेमातील शाहीदची भूमिका अनेकांना आवडली.
2005 साली आलेल्या 'वाह! लाइफ हो तो ऐसी' सिनेमाता तो अमृता रावसोबत झळकला. सिनेमात शाहिद एक आत्मा असल्याचं दाखवलं होतं.
2005 साली आलेल्या दिवाना हुए पागल सिनेमातही शाहिदने महत्त्वाची भूमिका निभावली.
2003 साली आलेल्या इश्क विश्क या सिनेमातून शाहिदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यासिनेमात तो कॉलेज स्टुंडटच्या भूमिकेत दिसला. या सिनेमासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यूचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.
बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचा आज 40 वाढदिवस आहे. आपल्या 18 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत शाहिदने विविध भूमिका निभावल्या. प्रत्येक भूमिकेत शाहिदने चाहत्यांना भूरळ पाडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -