In Pics | केवळ पंचवीशीत जिया खानने केली आत्महत्या, मृत्यूचे कारण आजही रहस्यच
अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याच्यासोबत तिचे अफेअर सुरु होतं. पण काही दिवसांनंतर त्यांच्या या नात्यात अंतर पडायला सुरुवात झाली.
जिया खानचा पहिला चित्रपट 'निशब्द' हा होता. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चनसोबत काम केलं आहे. त्यानंतर ती आमिर खान सोबत 'गजनी' आणि अक्षय कुमार सोबत 'हाऊसफुल' मध्ये काम केलं.
जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 साली झाला होता. तिचे केवळ तीनच चित्रपट रीलीज झाले आहेत. पण तिच्या सौंदर्याची जादू अशी होती की आजही अनेकांच्या तोंडी तिचे नाव आहे.
सुशांत सिंह राजपूतनेही आपला शेवट अशाच प्रकारे केला आहे. त्याच्याही मृत्यूचा तपास अद्याप लागला नाही.
जियाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आज आपल्यात जिया खान जरी नसली तरी तिच्या छोट्याशा प्रभावशाली कारकिर्दीमुळे ती कायम स्मरणात राहील.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा आज जन्मदिवस आहे. केवळ 25 वर्षाची असताना तिने 3 जून 2013 साली आत्महत्या केली. जिया खानचा मृत्यू आजही एक रहस्यच राहिलं असून त्याचा खुलासा झालेला नाही.
पोलिसांनी जियाच्या मृत्यू प्रकरणी सूरज पांचोलीला अटक केली आणि तुरुंगात टाकलं. नंतर त्याला जामीन मिळाला.
3 जून 2013 साली जिया खानचे प्रेत तिच्या जुहूच्या राहत्या घरी मिळाले. मरण्यापूर्वी जियाने सूरजसोबत संभाषण केलं होतं.