PHOTO | महानायकाचा वाढदिवस, जाणून घ्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयी खास गोष्टी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय सिनेसृष्टीतील महानायक अशी ओळख असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.
त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली.
बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले.
अमिताभ बच्चन यांचं मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन. त्यांच्या जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली झाला. त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे प्रसिद्ध कवी होते.
ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला.
हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे.
चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत जवळपास 200हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
1970 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली.
अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.
आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -